EPFO-SSA  परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

EPFO SSA २०२३ ची परीक्षा २ हजार  ६७४  सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांसाठी घेण्यात आली होती.

EPFO-SSA  परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेतर्फे (NTA)  एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट  (EPFO) मध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. EPFO SSA २०२३ ची परीक्षा २ हजार  ६७४  सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार recruitment.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

EPFO SSA फेज १ ची परीक्षा १८, २१, २२  आणि २३ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आली होती.  एकूण ६, ४६, २८७  उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख, ४६ हजार, ७२५ परीक्षार्थी बसले होते. EPFO SSA भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात एकूण २६ हजार, ७७७ उमेदवार पात्र ठरले, जे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा किंवा कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले. त्यापैकी २२ हजार, ८३३  उमेदवारांनी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या कौशल्य चाचणीला हजेरी लावली होती.

  EPFO SSA निकाल कसा तपासायचा

* सर्वप्रथम epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

*मुख्यपृष्ठावरील SSA निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.

*परिणाम स्क्रीनवर दिसून येईल.

*आता निकाल तपासा आणि डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट घ्या.