जातीभेदाच्या घटनांना तोंड देण्यासाठी योग्य कारवाई करा ; UGC चे विद्यापीठांना निर्देश 

आयोगाने जातीभेदाच्या घटनांना तोंड देण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

जातीभेदाच्या घटनांना तोंड देण्यासाठी योग्य कारवाई करा ; UGC चे विद्यापीठांना निर्देश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC ) देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना (attached college) जातीय भेदभावाचा (Caste discrimination) सामना करण्यासाठी सतर्क केले आहे. यासाठी सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी (SC, ST and OBC)प्रवर्गातील प्रतिनिधींचा समावेश अनिवार्यपणे करण्याची सूचना UGC ने दिल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व संस्थांना त्यांच्या वेबसाइटवर यासंबंधीच्या तक्रारींसाठी एक पेज तयार करण्यास सांगितले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तयारी जोरात सुरू असताना आयोगाने हे पाऊल उचलले आहे,अशा परिस्थितीत आयोगाने जातीभेदाच्या घटनांना तोंड देण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यास सांगितले आहे.या कालावधीत विशेष दक्षता ठेवण्याच्या सूचनाही आयोगाने विद्यापीठातील अधिकारी आणि प्राध्यापकांना दिल्या आहेत.

प्राध्यापकांनी अशा घटनांपासून स्वत:ला दूर ठेवण्याची काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे. या शिवाय UGC ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना गेल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष  2023-24 मध्ये घडलेल्या अशा घटनांचा तपशील देण्यास सांगितले आहे. या संदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात यूजीसीने त्यांना ३१ जुलैपर्यंत संस्थांमधील जातीय भेदभावाशी संबंधित घटनांचा तपशील देण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये अशा घटनांची संख्या, त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशीलही मागवला आहे.