MPSC Result : नोकरी, कुटुंब अन् अभ्यास अशी तारेवरची कसरत करत सोनाली मात्रे राज्यात मुलींमध्ये प्रथम 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत होते. अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

MPSC Result : नोकरी, कुटुंब अन् अभ्यास अशी तारेवरची कसरत करत सोनाली मात्रे राज्यात मुलींमध्ये प्रथम 
Sonali Matre

MPSC Result : बँकेत डेप्युटी मॅनेजरच्या पदाचा राजीनामा, पुढे शिक्षण अधिकारी पदाची जबाबदारी त्यातच घरात पती, छोटी मुलगी आणि सासू असे चौकोनी कुटुंब... अशा सर्व  जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलत सोनाली मात्रे (Sonali Matre) यांनी MPSC परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत होते. अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला, पहा संपूर्ण यादी

मात्रे यांनी राज्यात तिसरा तर मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकवला आहे. त्यांनी ६०१. ७५ एवढे गुण मिळवले आहेत. यावेळी  'एज्युवार्ता' शी बोलताना मात्रे म्हणाल्या, " मी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र' मध्ये ' डेप्युटी मॅनेजर' या पदावर होते. पण मला स्पर्धा परीक्षांचे आकर्षण होतेच. पती अजय बंड आणि सासूबाईंच्या पाठिंब्यामुळे मी २०२० मध्ये ती नोकरी सोडली आणि MPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

सध्या जळगाव येथे शिक्षण अधिकारी या पदावर आहे. लग्नाला ९ वर्ष झाली आहेत एक मुलगी आहे. मुलगी लहान आहे त्यामुळे तिला वेळ देणे खूप महत्वाचे होते. पण माझ्या सासूबाई आणि पतीने मला खूप मदत केली. मुलीला जेवण घालण्यापासून तिचं सगळं माझ्या सासूबाई आणि पती करत होते. त्यामुळे मला अभ्यासाला वेळ मिळत होता. मी दिवसाला ६ ते ७ तास अभ्यास करत होते." मूळच्या बीड जिल्ह्याच्या माजलगाव इथल्या मात्रे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पतींना दिले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2