B.Ed. CET निकालाचे नॉर्मलायजेशन कसे करणार; सीईटी सेलने केले स्पष्ट 

सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या B.Ed आणि ELCT CET परीक्षेसाठी राज्यातीलअ 79 हजार 984 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 72 हजार 479 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले.

B.Ed. CET निकालाचे नॉर्मलायजेशन कसे करणार; सीईटी सेलने केले स्पष्ट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell)घेण्यात आलेल्या बी.एड. सीईटी (B.Ed. CET)परीक्षेच्या निकालासाठी नॉर्मलायजेशन पध्दत (Normalization method)वापरली जाणार आहे.याबाबतची माहिती सीईटी सेलतर्फे परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी,(Difficulty level of the paper)परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी(total number of students appeared for the exam)आणि विद्यार्थ्याला मिळालेले गुण (marks obtained by the student)याचा विचार करून बी.एड.सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.त्यासाठी सूत्र तयार करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा निकाल पर्सेंटाईल पध्दतीने प्रसिद्ध केला जाणार आहे. 

सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या B.Ed आणि ELCT CET परीक्षेसाठी राज्यातीलअ 79 हजार 984 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 72 हजार 479 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. तर 7 हजार 505 विद्यार्थी गैरहजर राहिले.एकूण परीक्षेला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.62 एवढी  होती.परंतु, या परीक्षा शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. उमेदवारांना प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्नांचे वेगवेगळे संच देण्यात आले होते.त्यामुळे विविध प्रश्नपत्रिकांमध्ये समानता राखण्याचे सर्व प्रयत्न करूनही, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये निश्चित केलेली प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी सारखीच राखली गेली नसल्याची शक्यता आहे.अशा वेळी परीक्षेच्या कठीण पातळीमुळे उमेदवारांना फायदा किंवा तोटा होणार नाही यासाठी नॉर्मलायजेशान  अर्थात सामान्यीकरण पद्धत वापरली जाते.

नॉर्मलायझेशनची प्रक्रिया ही अनेक शिफ्ट पेपर्समधील उमेदवारांच्या गुणांची तुलना करण्यासाठीवारली जाणारी एक प्रचलित पध्दत आहे. भारतात घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी ती वापरली जाते.पर्सेंटाइल स्कोअर हे परीक्षेला बसलेल्या सर्वांच्या सापेक्ष कामगिरीवर आधारित गुण असतात. मुळात, प्राप्त गुणांचे रूपांतर परीक्षार्थींच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 पर्यंतच्या स्केलमध्ये केले जाते.पर्सेंटाइल स्कोअर त्या परीक्षेत त्या विशिष्ट टक्केवारीच्या बरोबर किंवा खाली (समान किंवा कमी स्कोअर) मिळवलेल्या उमेदवारांची टक्केवारी दर्शवते. त्यामुळे प्रत्येक सत्रातील टॉपरला (सर्वोच्च स्कोअर) 100 ची समान टक्केवारी मिळेल जी योग्य असणार आहे. सर्वोच्च आणि सर्वात कमी गुणांमध्ये मिळालेले गुण देखील योग्य टक्केवारीत रूपांतरित केले जातात.बंचिंग प्रभाव टाळण्यासाठी आणि संबंध कमी करण्यासाठी पर्सेंटाइल स्कोअर 7 दशांश स्थानांपर्यंत मोजले जातील.

विद्यार्थ्यांनी निकाल काढण्यासाठी कोणेते सूत्र वापरावे. 

सीईटी-सेल च्या माध्यमातून  B.Ed आणि ELCT CET परीक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या नॉर्मलायजेशन पध्दती संबंधातील सविस्तर परिपत्रक file:///C:/Users/User1/Desktop/CET-2024-B.Ed-Normalization.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून आपल्याला मिळालेले गुण नॉर्मलायझेशनमुळे कमी झाले की वाढले, हे समजू शकेल.