MHT CET 2024: PCM आणि PCB परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरू 

विद्यार्थी  महाराष्ट्र CET सेलच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर या  लिंकद्वारे अर्ज करू शकतात.

MHT CET 2024: PCM आणि PCB परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra State Common Entrance Test Hall)अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेतल्या जाणा-या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी (MHT CET 2024) नोंदणी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना PCM किंवा PCB गटासाठी महाराष्ट्र CET 2024 परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांना आजपासून नोंदणी करता येणार आहे.

विद्यार्थी  महाराष्ट्र CET सेलच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर या  लिंकद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार येत्या १ मार्च 2024 पर्यंत अर्जाची नोंदणी करू शकतील.  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) असे विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्यांना विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

परीक्षेच्या वेळापत्रकानुसार पीसीबी गटाशी संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे, पीसीबी गट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा २५ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत घेतली जाईल. या प्रवेश परीक्षांना बसण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले जातील.  विद्यार्थी हे प्रवेशपत्र परीक्षा पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकतील.