स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल

कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तलाठी भरतीसह (talathi bharti)विविध परीक्षांमधील भरती प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आणणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर (Rahul Kawthekar Chairman) यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेल्याची माहिती समोर आली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विटरद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तलाठी भरती प्रकरणात गोंधळ झाला पेपर फुटीच्या घटना घडल्या. त्यामुळे तलाठी भरती रद्द करावी, या मागणीसाठी बीडमध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मोर्चा काढला. पण मोर्चादरम्यान रोड ब्लॉक झाल्याचे कारण देत पोलिसांनी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

राज्य समन्वय समितीने तलाठी भरतीत टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना मदत करून तलाठी परीक्षेत पास केल्याचा आरोप राहुल कवठेकर यांनी केला होता. त्याचप्रमाणे इतरही अनेक प्रकरणे त्यांनी धक्कादायक माहिती शासनासमोर मांडली होती. त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील,असे सूचक विधान केले होते.

समन्वय समितीने तलाठी भरती रद्दसाठी शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत आम्हीही भरती रेटून येऊ देणार नाही,असे स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे विखे पाटील यांनी आपला शब्द खरा ठरवला आणि गुन्हे दाखल झालेच, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.