आरटीईचा प्रवेश या पाच शाळांमध्ये मिळणे अवघड

पोदार इंटरनॅशनलसह इतरही शाळांमध्ये सुमारे ८० जागांसाठी अडीच हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे कोणत्या भाग्यवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.                        

आरटीईचा प्रवेश या पाच शाळांमध्ये मिळणे अवघड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील काही तासात ऑनलाइन लॉटरीद्वारे (lottery) आरटीई प्रवेशाचे एसएमएस (SMS) प्राप्त होणार आहेत. परंतु, पुण्यातील या पाच शाळांमध्ये प्रवेशासाठी (School Admission) अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे फारच अवघड जाणार आहे. कारण या शाळांमध्ये प्रवेशासाठी साडेतीन ते अडीच हजारापर्यंत अर्ज आले आहेत. (RTE 2023 Admission News)         

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येेथे क्लिक करा. http://eduvarta.com/      

 राज्याच्या शालेय शिक्षण (Education) विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन आरटीई प्रवेशाची प्रक्रियेतून बुधवारी दुपारी ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु पुण्यातील या पाच शाळांमध्ये साडेतीन हजार ते अडीच हजारापर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत. पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे  ३ हजार ६०८ अर्ज आल्याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. परंतु, पोद्दार इंटरनॅशनलसर इतरही शाळांमध्ये सुमारे ८० जागांसाठी अडीच हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे कोणत्या भाग्यवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.                        

पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सर्वाधिक ३६०८ अर्ज आले असून त्यानंतर धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये प्रवेश मिळावा यासाठी २ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील प्रवेशासाठी २ हजार ८६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे न-हे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलसाठी २ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी आणि अमनोरा पब्लिक स्कूलमधील आरटीई प्रवेशासाठी २ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.                                          

 शहरातील अनेक नामवंत शाळांपैकी या पाच शाळांमध्ये सर्वाधिक प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक या पाच शाळांना मध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र बुधवारी दुपारी ४ वाजल्यानंतर प्रवेशाचे एसएमएस येण्यास सुरुवात होईल. त्यानंतरच या पाच शाळांसह इतर शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही हे पालकांना समजू शकणार आहे.