दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण 

लातूर विभागातील सर्वाधिक 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण आहेत.मागील वर्षी राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण होते.त्यात 109 विद्यार्थी लातूर विभागाचे होते.

दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दहावीच्या निकालात यंदाही लातूर पॅटर्नची (Latur pattern)चलती असल्याचे पाहायला मिळाले.राज्याचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर (10th result declared)झाला असून त्यात राज्यातील 9 हजार 382 शाळांचा निकाल 100 टक्के (100 percent)लागला आहे.तर राज्यातील 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.त्यात लातूर विभागातील (Latur Division)सर्वाधिक 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण आहेत.मागील वर्षी राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण होते.त्यात 109 विद्यार्थी लातूर विभागाचे होते.म्हणजे यंदाही लातूर विभागाने निकालावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.

यंदा लातूर विभागानंतर छत्रपती सांभाजीनगर विभागातील 32 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर पुणे विभागातील 10 मुंबई विभागातील 8, आमरावती विभागाच्या 7, कोकण विभागातील 3 आणि नागपूर विभागाच्या एका  विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळवले आहेत. परंतु, 100 टक्के गुण मिळवण्यात लातूर विभागाचे विद्यार्थी प्रथम क्रमांकावर असले तरी एकूण निकालात लातूर विभाग सातव्या क्रमांकावर आहे.

राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जातात.गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे बेस्ट ऑफ फाईव्हनुसार निकाल जाहीर केला जातो.यंदा अतिरिक्त गुणांचा लाभ घेऊन 187 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळाले आहेत.