पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दप्तरविना शाळा; शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तरविना शाळा भरणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाटू नये, शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, आवड जोपासली जावी या हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दप्तरविना शाळा; शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपुर्वी शनिवारी दप्तरविना शाळा (Saturday without school bag on School) भरवण्याचा निर्णय शासनाने (Government decision) घेतला. त्याची आता अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. त्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश (School education department orders all education officers) दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) पासून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तरविना शाळा भरणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाटू नये, शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, या हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रत्येक शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य दिले जाणार असून कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे उपक्रम शिक्षकांना घ्यावे लागणार आहेत. आठवड्यातील दोन दिवस त्यांना अभ्यासपासून विश्रांती भेटल्यानंतर ते सोमवारी शाळेत येतील आणि त्यांच्यातीत अभ्यास व शाळेबद्दत गोडी वाढलेली असेल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. 

शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढणार नाही, याची खबरदारी घेत आता त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने आता सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. दुसरीकडे आठवड्यातील पाच दिवस विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत. रविवारी तर सुटी असणार आहे, पण आता प्रत्येक आठवड्यातील शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत बोलावले जाणार आहे.