सर्व विषयात 35 गुण मिळवणारा प्रथमेश ; ५०० पैकी १७५ गुण

सर्व विषयात 35 गुण मिळवणारा प्रथमेश ; ५०० पैकी १७५ गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दहावीच्या निकालाबाबत (10th results)अनेकांना उत्सुकता होती. सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यामुळे प्रत्येकाला ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी उपलब्ध झाला. काहींना शंभर टक्के तर काहींना 90 ते 80 टक्क्यांपर्यंत गुण मिळाले. परंतु, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड (New English School Tilak Road)या शाळेतील एका विद्यार्थ्याला सर्व विषयात 35 गुण (35 marks in all subjects)मिळाले आहेत. फारच कमी विद्यार्थी 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतात. (student name Prathamesh Toopsoundar)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पुण्यातील अनेक नामांकित शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे. त्यात 35 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील प्रथमेश तूपसुंदर या विद्यार्थ्याला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. प्रथमेशने मराठी, हिंदी ,इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवले आहेत.