UPSC Results : IES आणि ISS परीक्षेचे निकाल जाहीर; असा पाहा निकाल

पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे, व्यक्तिमत्व चाचणीचे   वेळापत्रक योग्य वेळी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

UPSC Results : IES आणि ISS परीक्षेचे निकाल जाहीर; असा पाहा निकाल
UPSC Results

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2023 चे निकाल जाहीर केले आहेत.  उमेदवार upsc.gov.in या वेबसाइट वर जाऊन त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात. निवडलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी फेरीसाठी हजर राहावे लागेल.

पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे, व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक योग्य वेळी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल. तथापि, मुलाखतीची नेमकी तारीख उमेदवारांना ई-मेल, पत्राद्वारे कळवली जाईल, अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे. 

SPPU News : प्र-कुलगुरू निवडीला उरले काही तास; पूर्वीचे नाव मागे, नव्या नावांची चर्चा

आयोगाने एकूण ५१ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यापैकी १८ रिक्त जागा भारतीय आर्थिक सेवेसाठी आहेत आणि ३३ रिक्त जागा भारतीय सांख्यिकी सेवेसाठी आहेत.

असा पाहता येईल निकाल 

* आयोगाच्या upsc.gov.in. वेबसाइटला भेट द्या

* मुख्यपृष्ठावर, IES/ISS निकाल २०२३ लिंकवर क्लिक करा.
* स्क्रीनवर निकाल दिसेल.
* निकाल तपासा आणि डाउनलोड करा. प्रिंटआउट काढा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo