विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणानंतर बनारस हिंदू विद्यापीठाचे होणार विभाजन

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या IIT (IIT-BHU) च्या कॅम्पसमध्ये एका B.Tech विद्यार्थिनीसोबत विनयभंग आणि गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर आली आहे.

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणानंतर बनारस हिंदू विद्यापीठाचे होणार विभाजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) बी.टेकच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार विद्यापीठाच्या आयआयटी कॅम्पस आणि बीएचयूमध्ये (IIT-BHU) भिंत बांधण्याचाही समावेश आहे. बीएचयू कॅम्पसमध्ये भिंत बांधण्याबाबत सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. बीएचयू कॅम्पसमधील भिंतीला फूट पाडणारे धोरण म्हणत विद्यार्थी सोशल मीडियावरही या निर्णयाचा निषेध करत आहेत. 

 

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या IIT (IIT-BHU) च्या कॅम्पसमध्ये एका B.Tech विद्यार्थिनीसोबत विनयभंग आणि गैरवर्तन झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी संस्थेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या  मागणीसाठी ११ तास रस्त्यावर निदर्शने केली. त्यांतर ७ मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले. दुसरीकडे, आयआयटी बीएचयूने बीएचयूमध्ये सीमा भिंत बांधून बंद कॅम्पसची मागणी केली आहे.

JEE Main : ७५ टक्के पात्रता निकष काय आहे?

  

यासंदर्भात वाराणसीच्या आयुक्तांनी  संस्थेसाठी सीमा भिंत बांधण्याबाबत शिक्षण मंत्रालयाशी चर्चा केली आहे. सीपीडब्ल्यूडी आणि आयआयटी बीएचयू संयुक्तपणे प्राध्यापकांची समिती स्थापन केली जाईल आणि त्यांना इन्स्टिट्यूट कॅम्पसची सीमा भिंत बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम सोपवले जाईल. समिती एका आठवड्यात आपला अहवाल सादर करेल, असे या चर्चेत ठरले आहे. 

 

दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा IIT BHU कॅम्पसमध्ये बीटेक मॅथेमॅटिकल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तीन मुलांनी तिच्याजवळ येऊन दुचाकी उभी केली आणि तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या  विद्यार्थिनीला विवस्त्र करून तिचा व्हिडिओही बनवला. तिच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून, वाराणसीतील पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO