ICSI CSEET मे 2024 चा निकाल गुरूवारी

ICSI CSEET 2024 ची परीक्षा 4 मे रोजी घेण्यात आली होती. त्या दिवशी तांत्रिक समस्येमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांसाठी 6 मे रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 16 मे रोजी जाहीर केला जाईल.

ICSI CSEET मे 2024 चा निकाल गुरूवारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (ICSI) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) 2024 चा निकाल 16 मे रोजी दुपारी 2 वाजता घोषित केला जाईल. ICSI CSEET मे 2024 निकालाची लिंक icsi.edu या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

ICSI ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार उमेदवारांना त्यांचे निकाल आणि गुण ऑनलाईन पाहता येईल. निकालाची हार्ड कॉपी उमेदवारांना दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निकालाची प्रत डाउनलोड करून त्याची प्रिंटाउट घ्यावी. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% आणि एकूण 50% गुण आवश्यक आहेत. 