एलएलबी सीईटी २०२४ प्रवेश पूर्व परीक्षेची प्रक्रिया सुरू

परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी आहे.

एलएलबी सीईटी २०२४ प्रवेश पूर्व परीक्षेची प्रक्रिया सुरू
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने ( MAH CET)  5 वर्षांच्या एलएलबी सीईटी 2024 साठी माहिती पुस्तिका १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली आहे. माहिती पुस्तिकेनुसार अर्जाची प्रक्रिया येत्या १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी आहे. ऑनलाइन MAH-LLB ५-वर्षीय CET 2024 परीक्षा ५ मे  रोजी घेतली जाणार आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवार राज्यातील EWS उमेदवार,  राज्याबाहेरील (OMS) सर्व श्रेणीतील , भारतीय उमेदवार, जम्मू - काश्मीर आणि परदेशी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क एक हजार रुपये आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी सीईटी अर्ज शुल्क ८०० रुपये आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील निवडक शहरांमध्ये घेतली जाईल.
या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसून परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी भाषेत असेल. उमेदवार प्रदान केलेल्या मॉक टेस्ट लिंक्सचा वापर करून CET साठी ऑनलाइन सराव करू शकतात, अशी माहिती  सीईटीसेल कडून देण्यात आली आहे.