11th Admission : पुण्यात ४२ हजार विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड; विज्ञान शाखेत कोणते महाविद्यालय टॉपवर?

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

11th Admission : पुण्यात ४२ हजार विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड; विज्ञान शाखेत कोणते महाविद्यालय टॉपवर?
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

11th Admission Process : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (Centralised Admission Process) पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागात ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची पसंतीक्रमानुसार निवड झाली आहे. आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन २४ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. (The selection list for 11th admission announced today)

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार प्रवेश समितीकडून सकाळी दहा वाजता पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये त्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्याचे द्विलक्षी अभ्यासक्रम बंद होणार; नवीन अभ्यासक्रम ठरले, राज्य सरकारचा निर्णय

पुणे विभागात एकूण ८८ हजार ४१३ जागा असून त्यासाठी ६३ हजार ४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातून पहिल्या फेरीसाठी ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेसाठी २२ हजार विद्यार्थी आहेत. तर वाणिज्य शाखेसाठी १५ हजार आणि कला शाखेसाठी ३ हजार ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड पहिल्या पसंतीक्रमानुसार झाली आहे. सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये फग्युर्सन महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा सर्वाधिक ४७३ एवढा कटऑफ आहे. तर कला शाखेत सिम्बायोसिस महाविद्यालय आघाडीवर असून ४६८ कटऑफ आहे. वाणिज्य शाखेत बीएमसीसी महाविद्यालय आघाडीवर आहे. या महाविद्यालयाचा कटऑफ ४६६ एवढा आहे.

'सीबीएसई' बोर्ड होणार आता आंतरराष्ट्रीय; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

शाखानिहाय उपलब्ध जागा ( कंसात एकूण अर्ज)

कला – १४ हजार ६१ (४ हजार ६९३)

वाणिज्य – ३५ हजार २१५ (२१ हजार ५९२)

विज्ञान – ३६ हजार २१ (३६ हजार ७१२)

एचएसव्हीसी – ३ हजार ११६ (४४५)

एकूण – ८८ हजार ४१३ (६३ हजार ४४२)

 

शाखेनुसार विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश

कला – ३ हजार ८१२

वाणिज्य – १५ हजार ६२६

विज्ञान – २२ हजार ३७४

एसएसव्हीसी – ४२७

एकूण – ४२ हजार २३९

पसंतीक्रमानुसार झालेली निवड –

पसंतीक्रम     निवड झालेले विद्यार्थी

1.                २३ हजार ३५१

2.                ६ हजार ९७५

3.                ३ हजार ८९७

4.                २ हजार ४१२

5.                १ हजार ८२३

6.                १ हजार २९०

7.                ९५०

8.                ६७९

9.                ४८१

10.              ३८१

पुण्यातील टॉप महाविद्यालये (कंसात कला, वाणिज्य व विज्ञान शाखानिहाय कटऑफ)

कलमाडी हायस्कूल - (४३९, ४१८, ४५८)
मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर - (३०२, ४१५, ४४२)
आबासाहेब गरवारे कॉलेज - (२८९, NA, ४४८)
बीएमसीसी कॉलेज - (NA, ४६६, NA)
सिंबोयोसिस कॉलेज - (४६८, ४५३, NA) 
फर्ग्युसन कॉलेज - (४२९, NA, ४७३)
नेस वाडिया कॉलेज - (NA, ३१५, NA) 
एस. पी. कॉलेज - (३५८, ४४०, ४४९) 
एस एम जोशी कॉलेज - (NA, ३७३, ४२०)

 

शिक्षण मंडळानुसार निवड झालेले विद्यार्थी -

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी - ३६ - हजार २६८

सीबीएसई – ४ हजार ४८८

आयएससीई – १ हजार ३१७

आयजीसीएसई – ३९

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग – १३

इतर मंडळे – ११४

...तर प्रवेश घ्यावाच लागणार

विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिनमध्ये (Proceed for Admission) वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावा आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे. त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.

एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा/तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo