पुणे विद्यापीठात फुड मॉल की अस्वच्छतेचे दुकान?

अस्वच्छतेच्या निषेधार्थ समितीच्या सदस्यांनी शनिवारी सर्व दुकाने बंद केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छतेचे आदेश दिले.

पुणे विद्यापीठात फुड मॉल की अस्वच्छतेचे दुकान?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अस्वच्छता व अन्नपदार्थांचा निकृष्ट दर्जा याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) फुडमॉलमध्ये (Food Mall) आंदोलन करत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले. अस्वच्छतेच्या निषेधार्थ समितीच्या सदस्यांनी शनिवारी सर्व दुकाने बंद केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छतेचे आदेश दिले. (Protest against unsanitary food mall in Savitribai Phule Pune University)

गेल्या काही दिवसांत सातत्याने फुडमॉलच्या परिसरात प्रचंड घाण दिसून येत आहे, असा दावा समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी केला आहे. याअगोदर देखील काही दुकाने शौचालयाच्या जवळ  शिळा भात उघड्यावर वाळू घालताना देखील दिसून आली होती. विद्यार्थ्यांना अस्वच्छ  पदार्थ खाण्यासाठी दिले जात आहेत, असे ससाणे यांनी सांगितले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

सर्व दुकानदार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांला विषबाधा झाली तर त्याला सर्वस्वी हे दुकानदार आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल, अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहेत. आंदोलनानंतर कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार यांनी तात्काळ सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : प्रवेशपत्र लिक झाल्याची MPSC कडूनही कबुली; प्रकरण थेट पोलिसांत

पवारांच्या आदेशानंतर लगेचच सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला . तसेच  संबंधित दुकान मालकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. र्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, फुडमॉल, वसतिगृह मेस तसेच रिफेक्ट्री मधील जेवणाच्या दर्जा व स्वच्छता संदर्भात आपल्याला काही चुकीचे आढळून आले तर तात्काळ त्याला विरोध करा. त्याची कृती समितीला माहिती द्या, असे आवाहन ससाणे यांनी केले आहे.