डॉ. आंबडेकर जयंतीनिमित्त आझम कॅम्पसची मिरवणूक

मिरवणुकीत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते.

डॉ. आंबडेकर जयंतीनिमित्त आझम कॅम्पसची मिरवणूक
Azam Campus Students and staff

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (Azam Campus) च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीनिमित्त शुक्रवारी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीचे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कुलपती डॉ. पी. ए. इनामदार (Dr. P. A. Inamdar) यांच्या हस्ते झाले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एम. डी. लॉरेन्स, संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, असिफ शेख, अब्बास शेख, अफझल खान, मशकूर शेख, साबीर शेख, वाहिद बियाबानी यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

साधू वासवानी चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आणि संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.

या मिरवणुकीत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते. दरवर्षी  महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात.