CBSE सिंगल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्तीसाठी १८ ऑक्टोबर नोंदणी 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  एकल बालिका शिष्यवृत्ती- २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना  १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे.

CBSE सिंगल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्तीसाठी १८ ऑक्टोबर नोंदणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)  सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महत्त्वाची माहिती आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  एकल बालिका शिष्यवृत्ती- २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cbse.gov.in वरून अर्ज करू शकतात. 

हेही वाचा : बाल संशोधक विद्यार्थ्यांचा निधी जाणार परत ? इन्स्पायर स्पर्धेकडे फिरवली पाठ

 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना  १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज  स्वीकारले जाणार नाहीत. या शिष्यवृत्तीसाठी बोर्ड कोणताही ऑफलाइन अर्ज किंवा कागदपत्रांची हार्ड कॉपी स्वीकारणार नाही, असे  बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या मुली अविवाहित आहेत आणि CBSE संलग्न शाळांमध्ये ११ वी किंवा १२ वी मध्ये शिक्षण घेत आहेत. त्याचाप्रमाणे ज्या विद्यार्थिनींना CBSE शाळेतून इयत्ता १० वी मध्ये पहिल्या पाच विषयात ६० टक्के गुण मिळाले आहेत, अशाच मुली या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. 

--------------
असा करता येईल अर्ज 

 * प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.

*  'होमपेज' लिंकवर जा आणि ॲप्लीकेशन लिंकवर क्लिक करा.

* अर्ज  भरून नोंदणी शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

* अर्ज डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.