Independence Day : सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘फ्युचर इंडिया’ला सलामी

स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त आझम कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी 'फ्युचर इंडिया' संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

Independence Day : सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘फ्युचर इंडिया’ला सलामी
Independence Day Celebration

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (Azam Campus) येथे स्वातंत्र्य दिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठा'चे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार (Dr. P. A. Inamdar) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी 'फ्युचर इंडिया' संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शैक्षणिक, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यटन, खेळ अशा अनेक विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थानी सादर केला. या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली.

पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिपचा अर्ज भरला का? उरले फक्त दोन दिवस

संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, शाहीद इनामदार, एस. ए. इनामदार, डॉ. आरिफ मेमन, डॉ.नाझिम शेख, शाहीदा सय्यद, विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo