मुंबई विद्यापीठाकडून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; जूनपासून सुरुवात, आदेश प्रसिद्ध   

विद्यापीठाने 40-60 गुणांकन पॅटर्न तयार केला असून त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून केली जाणार आहे. 

मुंबई विद्यापीठाकडून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; जूनपासून सुरुवात, आदेश प्रसिद्ध   

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. त्यानुसार आता मुंबई विद्यापाठाने (Mumbai University) एनईपी (NEP) च्या पार्श्वभूमीवर बदलांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाकडून नवीन अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत आणि बाह्य मूल्यांकन पद्धत सुरु करण्यात येणार आहे. त्या पद्धतीचा पॅटर्न विद्यापीठाकडून निश्चित करण्यात आला आहे. विद्यापीठाने 40-60 गुणांकन पॅटर्न (40-60 scoring pattern) तयार केला असून त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 (Implementation Academic year 2024-25) पासून केली जाणार आहे. 

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले 894 हून अधिक महाविद्यालयात या नव्या पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे. या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना आदेश जारी केले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या या नव्या पॅटर्नमुळे आत्तापर्यंत सुमारे 100 गुणांची परीक्षा आणि त्यावर आधारीत मूल्यांकन होत असलेल्या कला, वाणिज्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये या नव्या पॅटर्ननुसार बदल होतील.

शिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रांतील असाईनमेंट, विषयाशी संबंधित कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव, ऑनजॉब ट्रेनिंग आदींचा यात समावेश असणार आहे. या नव्या अभ्यासक्रमाशी विद्यार्थी कसे जुळवून घेतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जूनपासून लागू केल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक सेमिस्टर परीक्षेसाठी 60 गुण निश्चित करण्यात आले आहेत. 40 गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी असतील. यात परीक्षा, प्रॅक्टिकल, असानमेंट आदींचा समावेश असेल. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाचा 40-60 गुणांकनाचा पॅटर्न पाहायला मिळणार आहे.