विद्यापीठ प्रवेश पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ

विद्यापीठातर्फे पदवी प्रवेशासाठी येत्या १३ जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी १४ ते १६ जून या दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठ प्रवेश पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विविध विभागातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परिक्षेचा ऑनलाईन अर्ज (Online Application of Entrance Test)भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या २० एप्रिलपासून सुरू झालेल्या प्रक्रियेसाठी आता आता २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी मिळाला आहे.

विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमाच्या  प्रवेशासाठी  प्रेवश परीक्षा अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेच्या अर्जाची मुदत  १० मे पर्यंत होती. आता ती वाढवून २० मे पर्यंत करण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे पदवी प्रवेशासाठी येत्या १३ जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी  १४ ते १६ जून या दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण केलेली असावी, तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. विद्यार्थ्यांनी  प्रवेश प्रक्रियेबाबत  https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx  या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.