पुण्यात राष्ट्रीय हॅकाथॉन; विद्यार्थ्यांना चार लाखांची पारितोषिके 

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी हॅकाथॉन स्पर्धा पुण्यात फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यात राष्ट्रीय हॅकाथॉन; विद्यार्थ्यांना चार लाखांची पारितोषिके 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसिटीई) मान्यतेने आणि  इनोव्हेशन फाउंडेशनच्या (Innovation Foundation)माध्यमातून 'इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (AISSMS Institute of Information Technology)या कॉलेजच्या आवारात आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी हॅकाथॉन स्पर्धा पुण्यात 17 व 18 फेब्रुवारी रोजी  आयोजित करण्यात आली आहे. नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेची नोंदणी सुरू झाली असून संस्थेच्या innovateyou.in या वेबसाईटवर स्पर्धक नावनोंदणी करू शकतात.स्पर्धेसाठी चार लाखांहून अधिक रक्कमेची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत. 

पुण्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी सितारामन यांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यालयात नुकतेच करण्यात आले.

कल्पेश यादव म्हणाले, सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवतील,अशा मूलभूत विषयांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचे आव्हान या स्पर्धेतील स्पर्धेकांसमोर असणार आहे.आधुनिक शेती, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने काय कल्पक उपाय निघू शकतात याचा शोध या स्पर्धेत घेतला जाईल. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहे, तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची सोय केली जाणार आहे.

देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली राहणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह देशभरातून स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव द्यावा, असे आवाहन एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (आयओआयटी) प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांनी केले. 

एआयसीटीई, एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचे प्रमुख साहाय्य या स्पर्धेसाठी असणार आहे. ब्रेनोव्हिजन ही संस्था तांत्रिक साहाय्य करणार आहे. स्पर्धा एनईएटी (दिल्ली) यांचे मार्गदर्शन असणार आहे.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांची रोख पारितोषिके या स्पर्धेतील विजेत्यांना दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. द्वितीय क्रमांकास एक लाख, तृतीय ७५,००० तर उत्तेजनार्थ २५ हजार रुपयांची दोन बक्षिसे असणार आहेत.
-------------------------------------------------