ऑल इंडिया बार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बार कौन्सिल ऑफ इंडियातर्फे AIBE 18 परीक्षा येत्या २९ ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

ऑल  इंडिया बार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Bar Exam Schedule Announced

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बार कौन्सिल ऑफ इंडियाने  (BCI) ऑल इंडिया बार परीक्षा XVIII (AIBE 18) च्या तारखा आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थी AIBE 18 साठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत  allindiabarexamination.com या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतील. तसेच बीसीआयने उत्तीर्णतेची टक्केवारी वाढवली आहे.  

हेही वाचा : दक्षिणेकडील राज्याने एनईपी कायमचे नाकारले ; पुढील वर्षांपासून एनईपी रद्द

बार कौन्सिल ऑफ इंडियातर्फे AIBE 18 परीक्षा येत्या २९ ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.परिषदेने सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी उत्तीर्णतेची टक्केवारी ४० टक्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढवली आली आहे.तसेच अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आणि PwD उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्के  गुण मिळवावे लागतील. यापूर्वी आरक्षित श्रेणींसाठी पात्रता टक्केवारी ३५ टक्के  होती.

AIBE 18 परीक्षेचे वेळापत्रक
या परीक्षेसाठी १६ ऑगस्ट म्हणजेच आजपासूनच  परीक्षेची नोंदणी करता येणार आहे.तसेच परीक्षेचे शुल्कही आजपासू भरता येईल,असे  बीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच अर्ज आणि शुल्क भरण्याची शेवटची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.उमेदवारांना १०  ऑक्टोबर पर्यंत अर्जात दुरुस्ती करता येऊ शकेल. तर २०  ऑक्टोबर रोजी  बीसीआयकडून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल.येत्या २९  ऑक्टोबर पासून परीक्षा सुरु होणार आहेत.