HSC Result : गुणपत्रिकेसाठी दहा दिवस थांबावे लागणार, सोमवारपासून भरा पुरवणी परीक्षेचे अर्ज

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पाच जून रोजी दुपारी तीन वाजता वितरित करण्यात येणार आहे.

HSC Result : गुणपत्रिकेसाठी दहा दिवस थांबावे लागणार, सोमवारपासून भरा पुरवणी परीक्षेचे अर्ज
HSC Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC  Board) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Result) गुरूवारी (दि. २५) ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका (HSC Marksheet) पाहण्यासाठी दहा दिवस थांबावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात पाच जून रोजी मिळतील. (HSC result will be announced on Thursday)

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पाच जून रोजी दुपारी तीन वाजता वितरित करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार (दि. २९ मे) पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल. 

मोठी बातमी : इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी जाहीर होणार

अशी होणार गुणपडताळणी

त्याचप्रमाणे ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh- hsc.ac.in) स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी दि. २६ मे ते दि. ५ जून पर्यंत व छायाप्रतीसाठी दि. २६ मे ते दि. १४ जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UP Net Banking) याद्वारे भरता येईल.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन

फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन ओक यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2