HSC Exam Update : इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढविली

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी ही माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे.

HSC Exam Update : इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढविली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC-HSC Board) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी (HSC Exam) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियमिक शुल्कासह अर्ज भरण्यासाठी यापुर्वी राज्य मंडळाकडून दि. ६ नोव्हेंबर ही मुदत दिली होती. आता मंडळाने ही मुदत वाढविली असून विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

 

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी ही माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची (12th Exam) लेखी परीक्षा दि. २१ पेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत.

इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

 

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना आता २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर दि. २४ नोव्हेंबरपर्यंत उच्च माध्यमिक शाळांना चलन डाऊनलोड करून शुल्क भरता येणार आहे.  

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच याच संकेतस्थळावरून परीक्षेचे अर्जही भरता येणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k