SPPU News : वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून गंभीर दखल

विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. विद्यार्थी नोंदणी करण्यावरून सुरू झालेला वाद दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीपर्यंत गेला.

SPPU News : वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून गंभीर दखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून मजूर लिहिलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) या घटनेचा निषेध केला आहे.

 

विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. विद्यार्थी नोंदणी करण्यावरून सुरू झालेला वाद दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीपर्यंत गेला. त्यात आता विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ मधील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना समोर आली, या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका

 

विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर  मोठ्या अक्षरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिला जात असताना विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. वसतिगृहाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा मजकूर कोणी लिहिला याची माहिती मिळणार आहे का? हा मजकूर विद्यार्थ्यांनीच लिहिला की विद्यापीठाबाहेरील कोणी लिहिला? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k