CBSE Result Update : दहावीत ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्केपेक्षा जास्त गुण

सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी यंदा १.२८ टक्क्यांनी घसरली आहे. मात्र कोविडच्या आधीच्या वर्षापेक्षा जास्त आहे. २०१९ मध्ये दहावीचा निकाल ९१.१० टक्के होता.

CBSE Result Update : दहावीत ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्केपेक्षा जास्त गुण
CBSE 10th Result Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत (CBSE) २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा (10th Result) एकूण निकाल ९३.१२ टक्के इतका लागला आहे. या निकालात तब्बल ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये ५८ विशेष विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी यंदा १.२८ टक्क्यांनी घसरली आहे. मात्र कोविडच्या आधीच्या वर्षापेक्षा जास्त आहे. २०१९ मध्ये दहावीचा निकाल ९१.१० टक्के होता. यंदाच्या निकालामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२५ इतकी असून मुलांच्या तुलनेत १.९८ टक्केंनी अधिक आहे.

हेही वाचा : CBSE Result : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकालाचे अपडेट...

परीक्षा दिलेल्या एकूण २१ लाख ६५ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी ४४ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९५ टक्के व त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण नऊ टक्के एवढे आहे. तर १ लाख ९५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २.०५ टक्के आहे.

विशेष विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार १५४ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार ६२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९२.६३ एवढी आहे. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच ९० टक्के व त्यापेक्षा अधिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २७८ एवढी आहे.

या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध -

https://www.cbse.gov.in

https://www.result.nic.in

https://www.results

https://results.digilocker.gov.in

https://umang.gov.in