भावी शिक्षकांसाठी मोठी बातमी; सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE ने २० जुलै ला  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच CTET  आयोजित केली होती. परीक्षा आयोजित केल्यानंतर, सीबीएसईने १५ सप्टेंबर रोजी परीक्षेच्या तात्पुरती उत्तरसुची प्रसिद्ध केली होती.

भावी शिक्षकांसाठी मोठी बातमी; सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (CTET) निकाल जाहीर करण्यात आला आहे. जुलै/ऑगस्ट २०२३ च्या निकालाची (CTET Result) वाट पाहत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी घडामोड आहे. CBSE च्या ctet.nic.in या लिंक वर उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. 

 

CBSE ने २० जुलैला  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच CTET आयोजित केली होती. परीक्षा आयोजित केल्यानंतर, सीबीएसईने १५ सप्टेंबर रोजी परीक्षेच्या तात्पुरती उत्तरसुची प्रसिद्ध केली होती. तर १८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर, CBSE ने सोमवारी CTET निकाल ऑगस्ट २०२३ जाहीर केला आहे.  

ZP भरती : शुल्क परताव्यात तांत्रिक अडसर, विद्यार्थी हतबल

 

उमेदवारांना  ctet.nic.in या लिंकवर संबंधित निकाल पृष्ठावर जाऊन, त्यांचा रोल नंबर भरून आणि सबमिट करून निकाल तपासू शकतात.  CTET जुलै  सत्राच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर CBSE द्वारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना बोर्डाकडून CET प्रमाणपत्र जारी केले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, उमेदवार विविध प्राथमिक (इयत्ता १ ते ५ वी) आणि देशभरातील केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, तसेच केंद्रीय मंडळांमध्ये CBSE, CISCE, NIOS, इत्यादी माध्यमिक शाळांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करू  शकतात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j

 

विविध राज्यांच्या सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते  ८ वी) वर्गातील पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतील.  CBSE ने सध्या फक्त CTET निकाल जुलै २०२३ अंतर्गत स्कोअर कार्ड जारी केले आहेत, तर त्यांची CTET प्रमाणपत्रे नंतर प्रसिद्ध केली जातील, असे निर्देश बोर्डाने दिले आहेत.