Cluster University : महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं...

मुंबईत सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Cluster University : महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

समूह विद्यापीठात (Cluster University) सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान (Grant) कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher Education Minister Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले. तसेच  समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुंबईत सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते.

स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई

 

कार्यशाळेत बोलताना पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. समूह विद्यापीठ हा असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे उच्च शिक्षणाची गंगोत्री तळा-गाळापर्यंत पोहोचण्यास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

 

समूह विद्यापीठांच्या माध्यमातून शहर किंवा परिसरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारची मानवी आणि पायाभूत संसाधने एकत्रित आणणे व या संसाधनांचा प्रभावी वापर करून उच्च शिक्षणामध्ये सुसूत्रता, नेमकेपणा, बहु/आंतरशाखीय अभ्यासक्रम, दर्जा आणि कौशल्य विकासाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

अखेर डॉ. विनायक काळे यांच्या नावाचा आदेश निघाला; ‘बी.जे.’ महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

 

राज्यातील  शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन्याकरिता शासनाने मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली आहे. यामुळे विद्यापीठांवरील प्रशासकीय भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे निर्माण  होईल आणि  विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील, असे रस्तोगी म्हणाले.

 

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उच्च शिक्षण संचालक देवळाणकर म्हणाले, राज्यात अनेक स्वायत्त शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित अध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय, संस्था समूह विद्यापीठासाठी इच्छुक आहेत. यासाठी याविषयी सविस्तर चर्चा, विचार मंथन व्हावे यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO