राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेची रणनीती कशी असावी; अप्पा हातनुरे, सुशील बारी यांचे मार्गदर्शन 

अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्या वतीने 19 मार्च ते 22 मार्च या कालावधीत नवी पेठ येथील पत्रकार भवन जवळील एम.एम.जोशी सभागृहात दररोज सायंकाळी 5.30 वाजता विद्यार्थ्यांसाठी संवाद व्याख्यानमालेचे आयोजित  करण्यात आले आहे.

राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेची रणनीती कशी असावी; अप्पा हातनुरे, सुशील बारी यांचे मार्गदर्शन 
पहिल्या दिवशी किरण देसले व दिलीप खाटेकर यांनी व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले .

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे: अर्हम फाऊंडेशन (arham foundation) व वास्तव कट्टा (vastav katta) आयोजित संवाद व्याख्यानमालेस सुरूवात झाली असून त्यात तज्ज्ञांकडून राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  (Joint Prelims Exam 2024) या परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन केले जात आहे. बुधवारी (दि.20) लोकसेवा अकॅडमी संचालक व लेखक अप्पा हातनुरे संयुक्त पूर्व  परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची रणनीती कशी असावी व उरलेल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, यावर प्रकाश टाकणार आहेत.तर स्पॉटलाईट अकॅडमीचे संचालक सुशील बारी हे विषय निहाय अभ्यास असा करावा, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

अर्हम फाऊंडेशन (arham foundation) व वास्तव कट्टा (vastav katta) यांच्या वतीने 19 मार्च ते 22 मार्च या कालावधीत नवी पेठ येथील पत्रकार भवन जवळील एम.एम.जोशी सभागृहात दररोज सायंकाळी 5.30 वाजता विद्यार्थ्यांसाठी संवाद व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले आहे.मंगळवारी  19 मार्च रोजी स्टेपअप अॅकॅडमीचे संचालक दिलीप खाटेकर व आर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक व लेखक किरण देसले यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन्ही वक्त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया आणि वास्तव कट्टाचे महेश बडे व किरण निंभोरे , डॉ. आतिश चोरडिया, स्वराज पगारिया आणि अंकुश धवणे यांनी या व्याखानमालाचे आयोजन केले असून एज्युवार्ता या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.व्याख्यानमाला वास्तव कट्टा  व एज्युवार्ता च्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहे.

व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्च रोजी स्पॉटलाईट अॅकॅडमीचे संचालक सुशील बारी  व लोकसेवा अॅकॅडमीचे संचालक आप्पा हातनुरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तर  तिसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या 21 मार्च रोजी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अॅकॅडमीचे संचालक सचिन ढवळे आणि शारदा अॅकॅडमीचे संचालक सचिन भस्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी येत्या 22 मार्चला लोकायन आयएएस अॅकॅडमीचे संचालक भूषण देशमुख आणि ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक महेश शिंदे परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.