त्या २१९ प्राध्यापकांना नेट सेट मधून सूट मिळणार ? 

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी यावर चर्चा करण्यात आली.तसेच २१९ पात्र प्राध्यापकांचा अहवाल युजीसीकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्या २१९ प्राध्यापकांना नेट सेट मधून सूट मिळणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयात एम.फील पदवीच्या आधारे प्राध्यापक (Professor on the basis of M.Phil degree) म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांचा अहवाल तयार करून त्याची विद्यापीठ प्रशासनातर्फे बारकाईने तपासणी करण्यात आली.तसेच संबंधित अहवाल युजीसीकडे सादर करण्याचा निर्णय शुक्रवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत (University Management Council) घेण्यात आला.

हेही वाचा : महाविद्यालयाचे तुघलकी फर्मान; मुलगा-मुलगी एकत्र बसल्यास, गप्पा मारल्यास थेट प्रवेश रद्द

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयात ११ जुलै २००९ पूर्वी एम.फील पदवीच्या आधारे अनेक प्राध्यापक रुजू झाले आहेत.या प्राध्यापकांना तात्पूर्ती मान्यता देण्यात आली आहे.या सर्व प्राध्यापकांच्या माहितीचे संकलन युजीसीच्या सूचनेनुसार विद्यापीठातर्फे करण्यात आले. प्राप्त झालेल्या प्राध्यापकांच्या प्रस्तावाची छाणणी करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीप पालवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली.या समितीने सर्व बाबींची तपासणी केली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी यावर चर्चा करण्यात आली.तसेच २१९ पात्र प्राध्यापकांचा अहवाल युजीसीकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.याचर्चेत संदीप पालवे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.बी.पवार ,डॉ. देविदास वायदंडे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

व्यवस्थापन परिषद सदस्य संदीप पालवे म्हणाले, युजीसीकडून २००९ पूर्वी एम.फील.झालेल्या प्राध्यापकांची माहिती मागवण्यात आली आहे.विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी २१९ प्रस्ताव युजीसीकडे पाठवले जाणार आहेत.दोन प्रस्ताव नियमात बसत नव्हते.त्यामुळे विधी विभागाकडून ते तपासून घेण्यात आले.आता या प्राध्यापकांना नेट-सेट मधून सूट द्यावी किंवा देऊ नये, याचा निर्णय युजीसी घेणार आहे.
----------------------------------