राज्यातील सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करा : आमदर सत्यजित तांबे 

शिक्षकांच्या बाबतीतील हा प्रश्न फक्त बृहमुंबई महानगरपालिका व मुंबई शहर व उपनगर येथे मर्यादित नसून राज्यतील सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आहे; सत्यजित तांबे

राज्यातील सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करा : आमदर सत्यजित तांबे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि दहावी- बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र केवळ मुंबईतील नाही तर राज्यातीलअ सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून (Election Duty) मुक्त करा अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे  (MLA Satyajit Tambe) यांनी राज्य मुख्य निवडणुक अधिकारी (State Election Commission) यांना पत्राद्वारे केली आहे.

एका शाळेमधील ९०-९० टक्के शिक्षक शाळाबाह्य कामाच्या  निमित्ताने व विशेषतः निवडणूकीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर आहेत. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. अशी परिस्थिती राज्यातील सर्व जिल्ह्याची आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील शिक्षक शाळाबाह्य कामे देऊ नये.तसेच फक्त एका जिल्ह्यासाठी हा निर्णय घेणे राज्यातील इतर शिक्षकांच्या दृष्टीने अन्यायकारक वाटतो. त्यामुळे  प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना द्यावा की, त्यांनी कुठल्याही शाळाबाह्य कामासाठी किंवा निवडणुक कामासाठी शिक्षकांना जबाबदारी देऊ नये. या कामासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत तातडीने सर्व जिल्हाधिकारी यांना परिपत्रक काढावे, अशी विनंती विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्य मुख्य निवडणुक अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.