राज्यसेवेतील टॉपर्स विनायक पाटील,पूजा वंजारी,धनंजय बांगर यांच्याकडून थेट मार्गदर्शन 

नवी पेठ येथील अहिल्या अभ्यासिकेशेजारील सॅफरॉन हॉटेल मागील संकल्प मंगल कार्यालयात रवीयवारी 10. 30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यसेवेतील टॉपर्स विनायक पाटील,पूजा वंजारी,धनंजय बांगर यांच्याकडून थेट मार्गदर्शन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येकाला पूर्वीच्या टॉपर्सशी संवाद साधता येणे शक्य नाही.त्यामुळेच येत्या रविवारी (दि.25) सकाळी 10.30 वाजता राज्यसेवा 2022 च्या परीक्षेतील टॉपर्सबरोबर संवादाचा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात प्रथम आलेला विनायक पाटील,मुलींमधून प्रथम आलेली पूजा वंजारी, मुलांमध्ये द्वितीय आलेला धनंजय बांगर तसेच ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेली सोनल सूर्यवंशी,नववी रॅंक मिळवणारा वैभव पडवळ आणि 28वी रॅंक मिळवणारा विशाल नवले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टातर्फे आयोजित 'संवाद टॉपर्स मार्गदर्शन -राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमात यशाचा मंत्र आणि प्लॅन बी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नवी पेठ येथील अहिल्या अभ्यासिकेशेजारील सॅफरॉन हॉटेल मागील संकल्प मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.अर्हम फाऊंडेशनतर्फे हा दहावा कार्यक्रम आयोजित केला जात असून यापूर्वीच्या कार्यक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा मिळाली आहे.त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश पगारिया यांनी केले आहे.

शैलेश पगारिया म्हणाले, राज्यातील विविध जिल्ह्यातून लाखो विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात.अनेकांना त्यातून यशही मिळते.मात्र,त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आणि अभ्यासाच्या नियोजनाची गरज असते. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना उचित मार्गदर्शन मिळत नाही.त्यामुळे अर्हम फाऊंडेशनतर्फे अशा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचे काम केले जाते.तसेच चुकून अपयश आल्यास प्लॅन बी कसा तयार करावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाते.

किरण निंभोरे म्हणाले,मागील परीक्षेतील टॉपर्स यांनी कसा अभ्यास केला , हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते शक्य होत नाही.येत्या एप्रिल महिन्यात राज्यसेवा परीक्षा होणार आहे.या परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संवाद टॉपर्स मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 
------------------------------