AICTE : देशभरातील तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत वाढवली 

‘एआयसीटीई’ने प्रवेशाच्या तारखेतील बदलासंदर्भात सुधारित शैक्षणिक कॅलेंडर २०२३ देखील जारी केली आहे. सुधारित कॅलेंडर AICTE च्या अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर देखील अपलोड करण्यात आले आहे.

AICTE : देशभरातील तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत वाढवली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

तांत्रिक महाविद्यालयांमध्ये (Technical Colleges) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने प्रवेशाची अंतिम मुदत वाढवली आहे. आता पात्र उमेदवार ३० ऑक्टोबरपर्यंत देशभरातील तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकता. कोणत्याही तांत्रिक महाविद्यालयात किंवा विद्यापीठात रिक्त जागा असल्यास विद्यार्थ्याला सहज प्रवेश मिळेल. यापूर्वी ही तारीख १५ सप्टेंबर होती.

 

‘एआयसीटीई’ने प्रवेशाच्या तारखेतील बदलासंदर्भात सुधारित शैक्षणिक कॅलेंडर २०२३ देखील जारी केली आहे. सुधारित कॅलेंडर AICTE च्या अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर देखील अपलोड करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानंतर AICTE ने शैक्षणिक दिनदर्शिका २०२३-२४ सुधारित केली आहे.

Pune News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू

 

त्यानुसार, सर्व AICTE मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांच्या संलग्नतेसाठी प्रवेशाची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर  पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेशाच्या दिवसांमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्यांना पुराचा फटका बसला होता आणि ईशान्येकडील विद्यार्थी सुद्धा मणीपूर येथील हिंसक घटनेमुळे तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकले नव्हते.

 

या पार्श्ववभूमीवर पंजाब विनाअनुदानित कॉलेजेस असोसिएशन-पंजाब विनाअनुदानित तांत्रिक संस्था संघटना (PUKA-PUTIA) चे अध्यक्ष आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कॉलेजेस, नियर राजपुरा, चंदीगडचे अध्यक्ष डॉ. अंशू कटारिया यांनी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे देशभरातील सुमारे ११ हजार  तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k