कारागृह विभागात मेगा भरती : शिक्षक, लिपिकासह अनेक पदांसाठी मागवले अर्ज 

सरळ सेवेने तब्बल 255 पदांची मेगा भरती केली जाणार आहे.

कारागृह विभागात मेगा भरती : शिक्षक, लिपिकासह अनेक पदांसाठी मागवले अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागातर्फे (prison department)सरळ सेवेने तब्बल 255 पदांची मेगा भरती (mega recruitment) केली जाणार आहे. त्यात शिक्षक, लिपिक, वरिष्ठ लिपिक (teacher, clerk, senior clerk) यांसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिवकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, मिश्रक आदी तांत्रिक पदेही भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना येत्या 21 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

कारागृह विभागात प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील पदे भरावयाचे आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत प्रक्रियेस प्रतिसाद मिळावा म्हणून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे कारागृह विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कारागृह विभागाकडून लिपिक पदाची 125 पदे, वरिष्ठ लिपिक 31 ,लघुलेखक निम्न श्रेणीची 4 , मिश्रिकाची 27 , शिक्षकाची 12,  शिवणकाम व सुतारकाम निदेशकाची प्रत्येकी 10 तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 8 पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे बेकरी निदेशकाची 4 पदे , विणकाम निदेशकाची व चर्मकला निदेशकाची प्रत्येकी 2 पदे भरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे करवत्या, लोहरकाम निदेशक, कातारी , गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेल लिपी निदेशक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षक निदेशक आदी मधील प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत.

हेही वाचा : बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांची घोर फसवणूक; परीक्षा रद्दचा निर्णय घेतला मागे

उमेदवारांना दोन दिवसांपासून अर्ज भरण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहेत.  येत्या 21 जानेवारीपर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील. परीक्षेचा दिनांक व कालावधी कारागृह विभागाच्या http:/www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षेचा दिनांक व कालावधी दिला जाईल. त्याचप्रमाणे संभाव्य बदलाबाबत उमेदवारांनी कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी दिलेली माहिती पहावी.
संवर्गनिहाय भरावयाची पदे , पदांचा तपशील,  वयोमर्यादा,  निवड पद्धती,  सर्वसाधारण सूचना,  अटी व शर्ती,  शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणे  आदी बाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील http:/www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी जाहिरातीद्वारे स्पष्ट केले आहे.