SPPU News : विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक

अनुराग हा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र (पुम्बा ) विभागाचा विद्यार्थी असून तो सध्या पीएच.डी. करत आहे. विद्यापीठाची निळ्या रंगाची इमारत आणि त्यावर ७५ हा अंक असा लोगो वर्षभर विविध कार्यक्रमात वापरला जाणार आहे.

SPPU News : विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या लोगो (SPPU Logo) तयार करण्याच्या स्पर्धेचे पारितोषिक अनुराग साळुंके (Anurag Salunke) या विद्यार्थ्याने पटकावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते लोगोचे अनावरण झाल्यानंतर साळुंके या विद्यार्थ्याला पारितोषिक देण्यात आले.

 

मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य व अमृत महोत्सवी वर्ष उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, सागर वैद्य आदी उपस्थित होते.

विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष विशेष लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  आणि उच्च शिक्षण मंत्री यांनी लोगोचे अनावरण झाल्याची माहिती ट्विट केली आहे. विद्यापीठातर्फे आयोजित स्पर्धेत ११६  स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातून अनुराग साळुंके या विद्यार्थ्याने तयार केलेल्या लोगोची निवड करण्यात आली.

 

अनुराग हा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र (पुम्बा ) विभागाचा विद्यार्थी असून तो सध्या पीएच. डी. करत आहे. विद्यापीठाची निळ्या रंगाची इमारत आणि त्यावर ७५ हा अंक असा लोगो वर्षभर विविध कार्यक्रमात वापरला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भव्य मुख्य इमारत व ज्ञान, आवेश आणि उगवत्या उत्साहाची व उमेदीची उत्कट ज्योत; ह्या लोगोमध्ये चित्रित केली आहे. ही ज्योत विद्यापीठाच्या मुख्य लोगोपासून प्रेरित आहे. लोगोमधील विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर असलेला भगवा ध्वज पूर्वेकडे फडकताना दर्शवला आहे, जो विद्यापीठाचे "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" असा दर्जा कायम ठेवताना दिसतो. लोगोच्या तळाशी असलेला अमृत कलश हा ज्ञान, सामाजिक जबाबदारी आणि कर्तृत्वाने भरलेला असून विद्यापीठाची ७५ वर्षांची समृद्ध परंपरा दर्शवून जातो. सदैव फुलणारी सोनेरी पाने व त्याची वेगाने वृद्धिंगत होणारी पालवी विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k