SPPU News : सांस्कृतिक स्पर्धांनी दुमदुमले विद्यापीठ, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

विद्यापीठामार्फत दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली होती.

SPPU News : सांस्कृतिक स्पर्धांनी दुमदुमले विद्यापीठ, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी (दि. २४ सप्टेंबर) 'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या रासेयो आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेव सभागृहात या सांस्कृतिक स्पर्धेचे व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 

विद्यापीठामार्फत दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या निवडक विद्यार्थ्यांची वक्तृत्व, निबंध, भारतीय लोकवाद्य वादन, भारतीय लोकगायन, पथनाट्य, भित्तीचित्र या विविध कलाप्रकांमध्ये ही सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्व स्पर्धेसाठी मेरी माटी मेरा देश, नवे शैक्षणिक धोरण - २०२०, पर्यावरण आणि सहजीवन, लोकसंख्या नियंत्रण विषयक धोरण असे विषय देण्यात आले होते.

कुलगुरूंनी कीर्तन परंपरेचा अपमान केला, माफी मागा! 'अभाविप'चा आरोप

 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूल्यशिक्षण आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातून त्यांची जडणघडण होत असते. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास व राष्ट्रसेवेची भावना वाढविण्यास रासेयो मोलाची भूमिका बजावते." प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी उपस्थितांना रासेयो स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी स्वच्छताही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.    

 

याप्रसंगी रासेयो राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ संदीप पालवे, डॉ. नितिन घोरपडे, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, राहूल पाखरे, प्राचार्य संजय चाकणे,विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, बिओडीचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, रासेयो चे तिन्ही जिल्ह्याचे समन्वयक, परीक्षक, स्पर्धक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन रासेयो चे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी केले. डॉ. सविता कुलकर्णी आणि डॉ. शिवाजी पाचर्णे यांनी सूत्रसंचालन केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j