‘मॉडर्न’च्या शिरपेचात मानाचा तुरा; रिझर्व्ह बॅंकेकडून मिळणार अनुदान

मान्यता मिळणारे हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव ठरले आहे. याअंतर्गत महाविद्यालयाला दर तीन महिन्यांनी आर्थिक साक्षरतेसाठी अनुदान मिळणार आहे.

‘मॉडर्न’च्या शिरपेचात मानाचा तुरा; रिझर्व्ह बॅंकेकडून मिळणार अनुदान
Modern College Camp

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाला (Modern College) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून अधिकृत मान्यता दिली. अशी मान्यता मिळणारे हे महाविद्यालय महाराष्ट्रातील (Maharashtra) एकमेव ठरले आहे. याअंतर्गत महाविद्यालयाला दर तीन महिन्यांनी आर्थिक साक्षरतेसाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Recognition of Modern College as Financial Literacy Center by Reserve Bank)

महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या फ्युचर्स बँकर्स फोरमने समाजाच्या आर्थिक साक्षरतेसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत. फ्युचर बँकेच्या बँक मित्र या उपक्रमाद्वारे समाजासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रधानमंत्री जन धन खाते उघडण्यासाठी मदत करणे, जनसुरक्षा योजनेची जनजागृती व असंघटीत विभागासाठी बँक खाते उघडणे, या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी मदत करणे, वेगवेगळ्या लोकांसाठी समन्वयक म्हणून काम करणे आदी कामे फोरममार्फत केले जातात, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी दिली.

हेही वाचा : मराठी विषयाचे मूल्यांकन 'श्रेणी' स्वरूपात ; राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर शाळांसाठी निर्णय

महाविद्यालयामध्ये ११ आँगस्टला RBI चे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्या स्मरणार्थ बँकिग दिवस साजरा केला जातो. तर १४ फेब्रुवारीला माय नेशन माय फ्राईड साजरा करणे, नविन वर्ष आजी-आजोबांबरोबर साजरे करणे, त्यांना बँक व्यवहारासाठी मदत करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बँक, ईन्शुरन्स व गुंतवणूक कनेक्ट, पॅन कार्डचा कार्यक्रम, असे आर्थिक साक्षरतेचे विविध कार्यक्रम बँकिंग फ्युचर्स फोरम गेली १० वर्ष घेत आहे, असेही खरात यांनी सांगितले.

महाविद्यालयाने २००९ पासून विद्यार्थ्यांना बँकेत जाऊन ट्रेनिंग घेणे सक्तीचे केले. यासाठी विद्या सहकारी बँकेशी २००८ पासुन करार केला आहे. तसेच २०२१ पासुन बँक आँफ महाराष्ट्र, काँसमाँस बँकेशी महाविद्यालयाने करार केलेला आहे. या कामाची दखल घेऊन डिपॉझिटरी एज्युकेशन अवेरनेस फंड (DEAF), RBI अंतर्गत महाविद्यालयाला आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

शेतकऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियानाअंतर्गत निमगाव म्हाळुंगी येथे झालेल्या कार्यक्रमात रिझर्व्ह बॅंकेचे एल. डी. ओ. निखिल गुलाक्षी उपस्थित होते. पुणे पीपल्स को आँपरेटिव्ह बँकेचे निवृत्त अधिकारी सदानंद दिक्षित, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी पी. एस. सरडे, माजी विद्यार्थी बापू काळे, सरपंच सविता कर्पे, उपसरपंच कविता चौधरी, माजी उपसरपंच तनुजा विधाटे, उद्योजक विजय कर्पे, पी. ई. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. संजय खरात, फोरमच्या अध्यक्ष प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. पल्लवी निखारे, प्रा. अदिती पिंपळे, डॉ. शुभांगी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.