NExT 2023 : आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET PG ऐवजी NEXT स्कोअर महत्वाचा ठरवण्यात आला होता.

NExT 2023 : आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित
NExt Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NMC AIIMS NExT 2023 : MBBS विद्यार्थी आणि AIIMS PG ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नॅशनल एक्झिट टेस्ट (NExT) स्थगित केली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) च्या वतीने डिसेंबरमध्ये घेतली जाणार होती आणि त्यापूर्वी या परीक्षेची मॉक टेस्ट २८ जुलै  होणार होती. ही परीक्षा कधी होणार याबाबत काहीच स्पष्टीकरण दिले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

NMC कडू या संदर्भात एक निवेदन प्रसिध्द केले आहे. "सर्व संबंधितांना याद्वारे कळविण्यात येते की, मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, दिनांक ११ जुलै  रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढील निर्देशापर्यंत राष्ट्रीय एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे," असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET PG ऐवजी NEXT स्कोअर महत्वाचा ठरवण्यात आला होता. याशिवाय परदेशातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर भारतात प्रॅक्टिस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NExT परीक्षाही अनिवार्य करण्यात आली होती. 

आयुष करणार कोट्यातील प्रवेशासाठी समुपदेशन; वेळापत्रकाची प्रतिक्षा

NMC ने नुकतेच NExT चे  नियम  जारी केले होते ज्यामध्ये ही परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार होती. NMC ने म्हटले होते की, भारतातील आधुनिक वैद्यक प्रणालीचा सराव करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी वैद्यकीय पदवीधराची पात्रता प्रमाणित करण्यासाठी NExT आधार तयार करेल. NExT परीक्षा बंधनकारक करण्यात आली होती. 

NExT परीक्षेचा पहिला टप्पा क्लिअर केल्यानंतर विद्यार्थी एक वर्षासाठी इंटर्नशिप करण्यासाठी पात्र ठरतील.  तसेच  पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुंणाचाही विचार केला जाणार होता. तसेच  इंटर्नशिपनंतर, वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात आधुनिक वैद्यकशास्त्राचा सराव करण्यासाठी परवाना आणि नोंदणी मिळविण्यासाठी पात्र होण्यासाठी NExT परीक्षेचा दुसरा टप्पा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते. NMC ने NExT परीक्षेसाठी मॉक टेस्टची अधिसूचना जारी केल्यापासून देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD