भारतीय नौदलात अग्निवीर होण्याची संधी! अधिसुचना प्रसिद्ध, 'या' तारखेपासून करा अर्ज

उमेदवार १३ मे २०२४ पासून अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय नौदलात अग्निवीर होण्याची संधी! अधिसुचना प्रसिद्ध, 'या' तारखेपासून करा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय नौदलाने (Indian Navy) (IAF) 02/2024 बॅचसाठी भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध (Notification of recruitment process published) केली आहे. अग्निवीर (SSR आणि MR) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवार १३ मे २०२४ पासून अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Apply online mode) करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे आहे. 

भारतीय नौदलाने अग्निवीर SSR आणि MR या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व अविवाहित स्त्री-पुरुष joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे १३ मे पासून अर्ज करू शकतात. या भरतीतून अनेक पदे भरली जाणार आहेत. 

अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी केंद्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी द्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा अभियांत्रिकी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स) गणित आणि भौतिकशास्त्रासह इयत्ता 12 वीत एकूण ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

नौदलाच्या या भरती निवड प्रक्रियेमध्ये फेज I (INET) आणि फेज II (PFT) समाविष्ट आहे, त्यात लेखी परीक्षा आणि भरती वैद्यकीय तपासणी देखील समाविष्ट आहे. यामध्ये, प्रवेश परीक्षेतील (INET) कामगिरीच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाते. जे पात्र ठरतील त्यांचा फेज II साठी समावेश केला जाईल. https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर तुम्ही अर्ज करू शकता आणि अधिसूचना पाहू शकता.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. 550 रुपये भरावे लागतील. याशिवाय 18 टक्के जीएसटीही भरावा लागेल. नेट बँकिंग किंवा Visa/Master/RuPay क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI वापरून फी भरली जाऊ शकते.

असा भरू शकतात अर्ज 

प्रथम अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in/ वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा. आवश्यक तपशील प्रदान करा. अर्ज जमा करा. आवश्यक कागदपत्रे जमा करा. कृपया भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.