केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पात्रतेत केला बदल

केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) शिक्षकांच्या  किमान पात्रतेबाबत एक नोटीस जारी केली आहे, त्यानुसार बीएड पदवीसह अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डी.एल.एड प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.

केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पात्रतेत केला बदल
Teachers' Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये (Kendriya Vidyalaya) प्राथमिक शिक्षकाची (Primary Teacher) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची घडामोड समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय विद्यालयांमध्ये प्राथमिक शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया (Teachers' Recruitment) सुरू करण्यात आली आहे. इच्छूकांकडून ऑनलाईन अर्जही भरून घेण्यात आले आहेत. मात्र, आता अचानक पात्रतेमध्ये बदल करण्यात आला असून अर्ज अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. पुर्वीची बीएड (BEd) ही पात्रता बदलून डीएलएड करण्यात आली आहे.

 

केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) शिक्षकांच्या  किमान पात्रतेबाबत एक नोटीस जारी केली आहे, त्यानुसार बीएड पदवीसह अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डी.एल.एड प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी या भरतीअंतर्गत प्राथमिक शिक्षक पदांसाठी अर्ज केले आहेत आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये B.Ed प्रमाणपत्र अपलोड केले आहे, त्यांनी त्यांचे D.El.Ed प्रमाणपत्र अपलोड करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

MPSC चा सुखद धक्का; लिपिक-टंकलेखक पदाच्या निकालाबाबत तीन महत्वाचे निर्णय 

पात्रतेबाबतची माहिती अपडेट करण्यासाठी KVS ने ऑनलाइन अर्ज दुरुस्ती विंडो आज म्हणजेच बुधवारी (दि. १३ सप्टेंबर) पासून सुरु केली आहे. ही विंडो  रविवारी (दि. १७ सप्टेंबर) रात्री १२ वाजेपर्यंत सुरु  ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी KVS भरती २०२२ मध्ये शिक्षक पदांसाठी अर्ज केला आहे, ते दिलेल्या कालावधीत KVS च्या अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वरील लिंकवरून लॉग इन करून त्यांचे D.El.Ed प्रमाणपत्र अपलोड करू शकतात.

 

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच  राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) घालून दिलेले नियम रद्द केले आहेत. प्राथमिक स्तरावरील केवळ डी.एल.एड. उमेदवारच वर्गात शिकवण्यासाठी पात्र असतील, असा आदेश दिला आहे. NCTE च्या नियमांनुसार, B.Ed उमेदवार प्राथमिक शिक्षक भरतीसाठी सशर्त पात्र असतील आणि त्यांना नियुक्तीच्या सहा महिन्यांच्या आत D.El.Ed. प्रमाणपत्र सादर करावे लागतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j