राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महिला शिक्षकांची संख्या वाढावी! मृणाल गांजाळे यांना पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय शिक्षक दिनी देशभरातील आदर्श शिक्षकांना मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मृणाल गांजाळे या महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महिला शिक्षकांची संख्या वाढावी! मृणाल गांजाळे यांना पुरस्कार प्रदान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतमध्ये उपशिक्षिका असलेल्या मृणाल गांजाळे (Mrunal Ganjale) यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पुरस्कारात महिला शिक्षकांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राष्ट्रीय शिक्षक दिनी (National Teacher's Day) देशभरातील आदर्श शिक्षकांना मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers' Award) देऊन गौरविण्यात आले. मृणाल गांजाळे या महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत.

पुरस्कार वितरण समारंभामध्ये मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाल्या, अध्यापनाच्या कार्यात महिलांची भागीदारी मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणाऱ्या शिक्षकांमध्येही महिलांची संख्या वाढायला हवी. विद्यार्थिनी व शिक्षिकांना प्रोत्साहित करणे महिला सशक्तीकरणासाठी खूप गरजेचे आहे.

Harsha Pisal : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका!

शिक्षकांना मुलांविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाची विशिष्ट क्षमता समजून आणि त्या क्षमतांना विकसित करण्यासाठी मुलांना मदत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एका मजबूत आणि जिवंत शिक्षण पध्दतीला विकसित करण्यावर जोर देण्यात आला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार मानण्यात आला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. आपले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चरक, सुश्रुत आणि आर्यभट पासून पोखरण आणि चंद्रयान ३ पर्यंत सर्व माहिती घ्यावी, त्यातून प्रेरणा घेत देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j