एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी होणार परीक्षा; अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ जुलै

केंद्रीय, राज्य विद्यापीठ, संस्थेतील चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे.

एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी होणार परीक्षा; अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ जुलै
ITEP Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NTA NCET 2023 : येत्या शैक्षणिक वर्षापासून ४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (NCET) आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १९ जुलै   आहे. NTA च्या ncet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थावरून अर्ज भरता येईल.

केंद्रीय, राज्य विद्यापीठ, संस्थेतील चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठी १२०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. तर ओबीसी प्रवर्गासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.

शिक्षक भरती : खासगी संस्थांमधील भरतीसाठी गुणोत्तर बदलले, पारदर्शकता येणार?

SC, ST आणि PWBD, तृतीयपंथी या श्रेणीसाठी ६५० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. NCET परीक्षेत बसण्यासाठी उमेदवाराला १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक असून यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या प्रवेश परीक्षेत मिळालेल्या श्रेणीनुसार उमेदवारांना विविध नामांकित महाविद्यालये/संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.

विद्यार्थ्यांना ही परीक्षा मराठीसह १३ भाषांमधून देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रात वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आणि एसएनडीटी महिला विद्यापीठात बीए. बीएड. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD