AIMA MAT 2023 : बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा, असा भरा अर्ज

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट सप्टेंबर २०२३ परीक्षेच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत.

AIMA MAT 2023 : बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा, असा भरा अर्ज
AIMA MAT 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

AIMA MAT  २०२३ : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) च्या मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (MAT) अंतर्गत पेपर आधारित चाचणी (PBT), संगणक आधारित चाचणी (CBT) आणि इंटरनेट आधारित चाचणी (IBT) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार www.mat.aima.in या  वेबसाइट  वरून अर्ज करू शकतात.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट सप्टेंबर २०२३ परीक्षेच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. PBT ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख दि. २९ ऑगस्ट असून ही परीक्षा ३ सप्टेंबरला होणार आहे. तर CBT परीक्षेसाठी  ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख  १२ सप्टेंबर असून ही परीक्षा १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Diploma Admission : फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

AIMA ही संस्था भारतातील ६०० हून अधिक बिझनेस स्कूलमध्ये प्रवेशासाठी मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट आयोजित करते. यासाठी  किमान पात्रतेची अट पदवी  आहे. पदवीच्या  अंतिम वर्षातील उमेदवार सुद्धा   मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट देऊ शकतात. 

अशी करता येईल नोंदणी 

- MAT च्या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा.

- नोंदणी केल्यानंतर वेबसाइटवर लॉग इन करा.

- त्यानंतर सर्व आवश्यक तपशील भरा 

- तपशील योग्यरित्या तपासा आणि अर्जाचे शुल्क भरा

- अर्ज डाउनलोड करा आणि  त्याची प्रिंट आउट घ्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD