इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू, उपसंचालकांचे महाविद्यालयांना निर्देश

प्रवेशासाठी http:11admission.org.in हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. विद्यार्थी रजिस्ट्रेशन येत्या २४ मे पासून सुरु करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थी यांनी प्रवेशासाठी सदर संकेतस्थळास भेट देऊन वेळेत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी.

इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू, उपसंचालकांचे महाविद्यालयांना निर्देश
11th admission update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया (11th Admission Process) सुरु करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पुणे  (Divisional Deputy Director of Education Pune) विभातील महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी http:11admission.org.in हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. विद्यार्थी रजिस्ट्रेशन येत्या २४ मे पासून सुरु (Student registration starts from 24 May) करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थी यांनी प्रवेशासाठी दिलेल्या संकेतस्थळास भेट देऊन वेळेत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. निकालापूर्वी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालय रजिस्टेशन येत्या २२ मे पासून ते राज्य मंडळाचा  इयत्ता १० वीचा निकाल येईपर्यंत सुरू राहणार आहे.ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल नाही त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षाच्या व्हेरीफाईड कॉपीसह स्वयंघोषणापत्र अपलोड करावे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी बदल करण्यापूर्वीच संकेत स्थळावरील माहितीची प्रिंट काढावी. आवश्यक बदल करुन बदलाबाबतचे सर्व आदेश अपलोड करावेत.बदलानंतरच्या माहितीची प्रिंट काढावी व अपलोड केलेली कागदपत्रे यांची हार्ड काॅपी येत्या ५ जून पुर्वी प्रमाणित करुन घ्यावी. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व माहिती तपासणी बदल असल्यास बदल करावा व लॉक करावे. त्यानंतरच विभागीय शिक्षण उपसंचालक लॉगीनला सदर कनिष्ठ महाविद्यालय दिसेल व त्यानंतरच व्हेरीफाय करता येईल. कनिष्ठ महाविद्यालयाचे व्हेरिफिकेशन करुन घेणे ही सर्वस्वी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची जबाबदारी आहे. नवीन कनिष्ठ महाविद्यालयाचे रजिस्ट्रेशन करावयाचे असल्यास त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव ३० मे पुर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमा 'करुन लॉगीन आयडी मिळवावा व त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती भरुन व्हेरिफिकेशन साठी उपस्थित राहावे. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व ऑनलाईन प्रवेशाचे काम करणारी व्यक्ती यांच्यासाठी २४ व २५ मे रोजी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. प्रशिक्षणास संबंधित प्राचार्यानी उपस्थित रहावे. 

असा करा अर्ज 

प्रथम अधिकृत संकेतस्थळ http:11admission.org.in वर जावे. रिजन Select करावे, Student Registration Tab वर क्लिक करावे, अर्जदाराचे इ. १० वी च्या शाळेचे ठिकाणानूसार पर्याय निवडावा. पुढे Applicant Status करावे,  इयत्ता  १० वी चा बैठक क्रमांक टाकावा. मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व कॅप्चा टाकावा, Board Select करावे, लॉगीन आयडी व पासवर्ड टाकावा, Proceed to Application Form वर क्लिक करावे. वैयक्तिक माहिती भरावी, पत्ता टाकावा, संवर्ग (Reservation) नमूद करावा. शैक्षणिक माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, फी भरावी,  Lock Application Form वर क्लिक करावे, Documents व अर्ज व्हेरिफिकेशन करून घ्यावे, सेव करुन सबमिट करावे व प्रिंट काढून घ्यावी.