NEP 2020 : शालेय शिक्षणात अंमलबजावणीसाठी १६ जणांची सुकाणू समिती

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या १०+२+३ या रचनेमध्ये बदल करून ५+३+३+४ याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यंच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.

NEP 2020 : शालेय शिक्षणात अंमलबजावणीसाठी १६ जणांची सुकाणू समिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) उच्च शिक्षणामध्ये (Higher Education) या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तर शालेय शिक्षणात (School Education) पुढील वर्षीपासून समावेश केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची सुकाणू समिती स्थापन केली आहे.

 

राज्य शासनाकडून समितीच्या स्थापनेबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मुख्यतः सर्वांना सहज शिक्षण (Access ), समानता (Equity), गुणवत्ता (Quality), परवडणारे शिक्षण (Affordability) आणि उत्तर दायित्व (Accountability) या पाच स्तंभावर आधारीत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या १०+२+३ या रचनेमध्ये बदल करून ५+३+३+४ याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यंच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.

राज्यातील शिक्षक काळ्या फिती लावून करणार काम; शिक्षक दिनी सरकारचा निषेध

राज्यातील सर्व शाळांमध्ये NEP, २०२० ची प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय यंत्रणा (नोडल एजन्सी) म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. शासन स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या अन्य समित्यांचा अहवाल या समितीने वेळोवेळी मागवावा व आवश्यक ते निर्देश द्यावेत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, मंत्री दीपक केसरकर हे समितीचे अध्यक्ष असतील. तर विभागाचे अवर सचिव/कक्ष अधिकारी सदस्य सचिव आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक आणि शालेय शिक्षण विभागाचे (विद्यार्थी विकास) सहसचिव ह अधिकारीही समितीमध्ये आहेत. तर दोन शिक्षणतज्ज्ञ, दोन बाल मानसशास्त्रज्ञ, दोन बाल विशेषज्ञ, दोन योग्यता चाचणी तज्ज्ञ, एक क्रीडा तज्ज्ञ आणि एक सांस्कृतिक तज्ञांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अशी असेल समितीची रचना -