विद्यार्थ्यांनो, लवकरच उघडणार ‘जादुई पिटारा’; खेळांच्या माध्यमातून घ्या शिकण्याचा आनंद
‘जादुई पिटारा' मध्ये प्लेबुक, खेळणी, कोडी, पोस्टर्स, फ्लॅश कार्ड्स, गोष्टींची पुस्तके, वर्कशीट यांसह विविध खेळ, शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (NEP 2020) विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण न टाकता त्यांना हसतखेळत शिक्षण (Education) घेता यावे यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार खेळांच्या माध्यमातून शिकण्याचा आनंद घेता यावा, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) ‘जादुई पिटारा’ (Jadui Pitara) ही संकल्पना राबविली जात असून महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थ्यांसाठी हा पिटारा लवकरच उघडला जाणार आहे.
‘जादुई पिटारा' मध्ये प्लेबुक, खेळणी, कोडी, पोस्टर्स, फ्लॅश कार्ड्स, गोष्टींची पुस्तके, वर्कशीट यांसह विविध खेळ, शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे स्थानिक संस्कृती, सामाजिक संदर्भ आणि भाषा यांचे प्रतिबिंब त्यात असून लहान मुलांची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि मूलभूत टप्प्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण होतील अशाप्रकारे त्याची रचना केली आहे.
ब्लिस शाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा; विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे प्रवेश, भरमसाठ शुल्क वसूल
एनसीईआरटीकडून देशभरात शैक्षणिक परिषदांसाठी हा जादुई पिटारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुसार संबंधित राज्यांत स्थानिक भाषांमधून सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मराठीतून हा पिटारा तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे समजते. परिषदेला ५३ साहित्याची यादी मिळाली असून त्याप्रमाणे ते उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लवकरच खेळांच्या माध्यमातून शिक्षणाचा आनंद घेता येणार आहे.
Maharashtra News : महाराष्ट्राला मिळाले पाच नवीन शैक्षणिक चॅनल; टेस्टिंगचे काम सुरू
जादुई पिटारा" ची ठळक वैशिष्ट्ये -
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत टप्प्याचे NCF-FS मुख्य परिवर्तनात्मक पैलू - 'खेळांच्या माध्यमातून शिका'
- पायाभूत अवस्था – ३ ते ८ वयोगट - खेळांच्या माध्यमातून सर्वोत्तम आणि प्रभावीपणे शिका
- न्यूरोसायन्सपासून शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांतील संशोधन शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांतील संशोधन
- इयत्ता पहिली आणि दुसरीला देखील लागू होते (वय ६-८)- मुले खेळातून शिकतील, मजा करतील आणि मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र यांचे ज्ञान होईल.
- पाच क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि विकास : शारीरिक विकास, सामाजिक-भावनिक आणि नैतिक विकास, संज्ञानात्मक विकास, भाषा आणि साक्षरता विकास, सौंदर्य आणि सांस्कृतिक विकास, याव्यतिरिक्त सकारात्मक शिकण्याच्या सवयीचा देखील या टप्प्यात विकासाचे आणखी एक क्षेत्र म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मराठी भाषा विद्यापीठाचा आराखडा दोन महिन्यांत; सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष
- खेळण्यासाठी अनुकूलता : केवळ पुस्तकेच नव्हे तर शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी वापरल्या जाणार्या संसाधनांची विस्तृत श्रेणी
- खेळणी, कोडी, कठपुतळीचा खेळ
- पोस्टर्स, फ्लॅश कार्ड
- कार्यपत्रिका आणि आकर्षक पुस्तके
- स्थानिक वातावरण, संदर्भ आणि समुदाय
- भारतीयांच्या जीवनात रुजलेले स्थानिक संदर्भ
- जादुई पिटारा मध्ये हे सर्व अंतर्भूत आहे :
- संसाधनांची श्रेणी
- विविधता आणि स्थानिक संसाधने सामावून घेण्याची लवचिकता
- मौज
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD