बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना NEP नुसार प्रथम वर्षात प्रवेश कसा मिळणार? काय आहे विद्यापीठाचे नियोजन  

पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिलह्यातील 46 तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना एनईपी विषयक माहिती दिली जाईल.विद्यापीठातर्फे याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना NEP नुसार प्रथम वर्षात प्रवेश कसा मिळणार? काय आहे विद्यापीठाचे नियोजन  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (Implementation of National Education Policy) केली जाणार आहे. यंदा इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (12th passed students)एनईपीचे (NEP)पहिलेच वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एनईपीअंतर्गत झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील 43 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 4 मार्गदर्शनपर व्याखानांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुध्दा पुढील 15 दिवसात आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर (Dr. Parag Kalkar)म्हणाले,राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तयारी केली आहे. विद्याशाखा निहाय सर्व विषयाच्या अभ्यासमंडळांच्या माध्यमातून संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. काही कारणास्तव राहिलेल्या प्राध्यापकांसाठी पुन्हा कार्यशाळा घेतली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डॉ. काळकर म्हणाले, स्वायत्त महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी या वर्षांपासून इतर संलग्न महाविद्यालयात एनईपी अंमलबजावणीचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दीड तासांचे एक अशा 4 व्याखानांचे आयोजन केले जाईल.गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत याबाबत प्रस्ताव स्वीकारले आहेत.त्यानुसार पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिलह्यातील 46 तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना एनईपी विषयक माहिती दिली जाईल.विद्यापीठातर्फे याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

------------------------------