NEET UG 2024: अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडली; 'असे' करता येणार बदल

उमेदवार अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जावून सुधारणा करू शकतात.

NEET UG 2024: अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडली; 'असे' करता येणार बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज नोंदणीकृत उमेदवारांसाठी NEET UG 2024 दुरुस्ती विंडो (The changes window opens) पुन्हा उघडली आहे. यामुळे आता अर्जदारांना 15 एप्रिलपर्यंत त्यांच्या अर्जामध्ये बदल करता येणार आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन सुधारणा करू शकतात.

दुरुस्ती विंडो उघडण्यासाठी एजन्सीला NEET UG उमेदवारांकडून निवेदने मिळाली होती. उमेदवारांचा शैक्षणिक हेतू आणि पालकांच्या विनंतीचा मान ठेवून ही विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. NEET UG नोंदणीकृत उमेदवार 12 एप्रिल रात्री 11:50 वाजेपर्यंत अपलोड केलेल्या कागदपत्रांसह अर्ज संपादित करू शकतात. तर 15 एप्रिलपर्यंत, नोंदणीकृत अर्जदारांसाठी फक्त आधार संबंधित प्रमाणीकरण दुरुस्तीची परवानगी आहे. प्रमाणीकरणाची विंडो 11:50 वाजता बंद होईल. परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

NTA ने निवेदन म्हटले आहे की, "15 एप्रिलनंतर, एजन्सी NEET UG अर्जामध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती स्वीकारणार नाही. उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही एक शेवटची संधी देण्यात आली आहे, यापुढे उमेदवारांना दुरुस्त करण्याची कोणतीही संधी दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अत्यंत सावधगिरीने सुधारणा कराव्यात,"  असे सूचित करण्यात आले  आहे. 

असा करता येणार बदल.. 

उमेदवरांनी प्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्यावी. त्यानंतर उमेदवारांना होमपेजवर असलेल्या सुधारणा विंडो लिंकवर क्लिक करावे लागेल. ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरुन अर्ज ओपन करावा लागेल. येथे वर दिलेल्या वेळापत्रकानुसार फॉर्ममध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून घ्या.