अर्हम फाऊंडेशन, वास्तव कट्टा आयोजित संवाद टॉपर्स मार्गदर्शन : विनायक पाटील, पूजा वंजारी यांच्याशी थेट संवाद

विनायक पाटीलने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच एमपीएससीच मैदान कसं गाजवलं

अर्हम फाऊंडेशन,  वास्तव कट्टा आयोजित संवाद टॉपर्स मार्गदर्शन : विनायक पाटील, पूजा वंजारी यांच्याशी थेट संवाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यसेवा परीक्षेत (State service exam)  प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या टॉपर्सकडून मोफत मार्गदर्शन (Free guidance from toppers) घेण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची सुवर्ण संधी स्पर्धा परीक्षांची (Competitive Examination) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. राज्यसेवा 2022 मधील रॅंक 1 (Rack 1 in 2022) विनायक पाटील (Vinayak Patil), मुलींमधून प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेली पूजा वंजारी (Pooja Vanjari) यांच्यासह इतरही टॉपर्सकडून 'राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन घेता येणार आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता पुण्यात नवी पेठ येथील अहिल्या अभ्यासिकेशेजारील सॅफरॉन हॉटेल मागील संकल्प मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खास स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून सर्वांसाठी खुला आहे. 
  
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 'अर्हम फाऊंडेशन' आणि स्पर्धा परीक्षांचे वास्तव मांडणाऱ्या 'वास्तव कट्टा' तर्फे 'संवाद टॉपर्स मार्गदर्शन -राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यसेवा 2022 च्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेला विनायक पाटील, मुलींमधून प्रथम आलेली पूजा वंजारी, मुलांमध्ये द्वितीय आलेला धनंजय बांगर तसेच ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेली सोनल सूर्यवंशी,नववी रॅंक मिळवणारा वैभव पडवळ आणि 28 वी रॅंक मिळवणारा विशाल नवले यांच्याकडून या कार्यक्रमात मार्गदर्शन मिळणार आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आहेत.पण त्यांच्या या अभ्यासाला योग्य दिशा असली पाहिजे.ही दिशा संवाद टोपर्स मार्गदशन या कार्यक्रमांद्वारे मिळू शकते.त्यामुळे या कार्यक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. एज्युवार्ता या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहे. 
 कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील मुदाळ या गावातील विनायक पाटीलने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षीच एमपीएससीच मैदान कसं गाजवलं .अनेक मुली स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यामुळे लग्न पुढे ढकलतात किंवा लग्नानंतर त्यांच्यात अभ्यासात खंड पडतो.पण लग्न होऊन दोन वर्ष झाली तरीही पूजा वंजारी राज्यात मुलींमध्ये पहिली आली. त्यांनी हे कसं शक्य करून दाखवल,अशा अनेक प्रश्नांची व विविध शंकांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'राजसेवा परीक्षेला सामोरे जाताना...'या कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित रहावे,असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ.शैलेश पगारिया, महेश बडे, किरण निंभोरे, राहुल शिंदे, डॉ.अतिश चोरडिया, स्वराज पगारिया, अंकुश धवणे यांनी केले आहे.